Panvel News : पिल्ले महाविद्यालयाच्या अलिग्रिया महोत्सवाला युवा ग्रामीण पत्रकार संघाचा विरोध

•चरस, गांजा, कार्यक्रमाच्या पासेसची बाहेरील व्यक्ती विक्री, सांस्कृतिक कार्यक्रमाला डाग लागण्याचा घेतला आक्षेप
पनवेल :- नवी मुंबईतील आणि मुंबई शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेले पिल्लेज महाविद्यालय यांचे दरवर्षी आलीग्रिया महोत्सव साजरा केला जातो. यंदाही महाविद्यालयाकडून हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु, काही विद्यार्थी या कार्यक्रमाला डाग लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पनवेल तालुका अध्यक्ष जितीन शेट्टी यांनी कार्यक्रमाबाबत पिल्ले महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
अलीग्रिया महोत्सवात बऱ्याच वेळा कार्यक्रमाचे पासेस बाहेरील व्यक्तींना विक्री केली जाते. तसेच, कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक विद्यार्थी ड्रग्स व ड्रग्स मिश्रित सिगारेटची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. विद्यार्थी कॉलेजच्या आवारातच नशा करताना दिसतात. त्यामुळे या कार्यक्रमाला गालगोट लागण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, या कार्यक्रमात सुसंस्कृत कार्यक्रम व्हावे, तरुणांनी आपल्या कलातून समाजाला दिशा द्यावी किंवा एखादा समाजिक विषय हाताळून त्याची जनजागृती करावी असे कार्यक्रम या निमित्ताने पार पाडावे अशी विनंती पत्रातून केली आहे.