Panvel News : सामाजिक कार्यांचा डोंगर उभारणाऱ्या यमुना शैक्षणिक -सामाजिक संस्थेचा होणार गौरव!
उरण : कोविड १९ मधे अडीच महिने लोकांना शिजवलेले अन्न पुरविले.कोविड परिस्थिती मध्ये आदिवासी वाडया -वस्त्यांवर अडकलेल्या आदिवासी गोर -गरीब जनतेच्या एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य वाटप,संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक,क्रीडा क्षेत्रात भरीव असे अर्थसहाय्य, गोर -गरिबांना गरजुना घरासाठी आर्थिक मदत,जिल्हा परिषद शाळांना ६०० हून अधिक संगणक वाटप, आतापर्यंत जनतेच्या सेवेसाठी १५ रुग्णवाहिका, शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी लाखोंची मदत,अखंड हरीनाम सप्ताह, पायी दिंडी साठी आर्थिक सहकार्य,गावो -गावी आरोग्य शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करून वैद्यकीय सेवा खेड्या पाड्यात पोहोचवून जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप, गरिबांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमातील शाळा सुरु करून अत्यल्प फी तर काहींना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण,रयत शिक्षण संस्थेच्या पडक्या इमारतींचे नूतनिकरण करण्यासाठी सढळ हस्ते मदत. अशा अफाट कार्याचा डोंगर उभारणाऱ्या शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत व सरचिटणीस सौ. शुभांगी महेंद्र घरत यांचा गौरव पनवेल टाईम्स या वृतपत्राच्या १६ व्या वर्धापन दिना निमित्ताने २१ सप्टेंबर रोजी पनवेल येथे होत आहे. Panvel Latest News