वर्ग २ ची जमीन असता खरेदीखत झाला कसा? शासनाची केली फसवणूक ; चौकशी करून गुन्हा दाखल करा! आदिवासी सेवा संघानी केली मागणी..
पनवेल: पनवेल तालुक्यातील मौजे सावणे, कुटलवाडी आदिवासी कातकरी ग्रामस्थांवर श्री. प्रकाश गायकवाड या बिगर आदिवासींकडून सातत्याने अन्याय होत असल्याने आदिवसी सेवा संघाच्या वतीने खुटलवाडीतील शेकडो ग्रामस्थांसहित (दि. २६ ऑगस्ट) रोजी पनवेल तहसील कार्यालयात येथील नायब तहसीलदार श्री. संभाजी शेलार यांना निवेदन देण्यात आले.
खुटलवाडीतील कातकरी ग्रामस्थ हे पिढ्यांपिढ्यापासून राहत असल्याने गावाच्या बाजूलाच कातकरी ग्रामस्थांची वहिवाटीच्या जागेमध्ये पूर्वीपासूनच दफनभूमी, विसर्जन घाट, स्मशानभूमी, विहीर, बोरवेल तसेच रा.जि.प. प्राथमिक शाळा असल्याने या ठिकाणी ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून वहिवाटीचे रस्ते देखील आहेत.
मात्र, प्रकाश गायकवाड या बिगर आदिवासी व्यक्तीने काही महिन्यापूर्वी माझी जागा असल्याचे सांगत या ठिकाणी कंपाउंड टाकण्याचे काम चालू केले होते. एवढच नाही तर दफनभूमीवर जे.सी.बी.च्या साहाय्याने भुईसपाट केले व शासकीय निधीतून बांधण्यात आलेले विहीर, बोअरवेल, विसर्जन घाट, स्मशानभूमी, पाणी आडवा पाणी जिरवा बंधारा तब्यात घेऊन कातकरी ग्रामस्थांचे वहिवाटिचे रस्ते बंद केले असल्याने खुटलवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. तसेच मौजे सावणे, स.नं. ७२/३ हा सातबारा वर्ग २ चा असून देखील प्रकाश गायकवाड यांच्या नावे खरेदीखत झाला कसा? याची चौकशी करावी. आणि ए.न. नसतांना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले असल्याने ते थोडण्यात यावे, असे मा. तहसीलदार पनवेल यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
सदर नायब तहसीलदार श्री. संभाजी शेलार यांनी तात्काळ चौकशी करण्याचे सांगितले आहे. यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, मा. अण्णा हजारे यांचे विश्वस्त, जेष्ठ समाजसेवक अल्लाउद्दील शेख, पत्रकार सुनील वारगडा, खुटलवाडीतील ग्रामस्थ शंकर पवार, चंद्रकांत पवार, बाळाराम वघे, शंकर वाघमारे, राजाराम कातकरी, राजाराम कातकरी, राजेश पवार, विलास कातकरी, अरुण वाघमारे, तुळशी वाघे, आशा पवार, वनिता पवार, सोनी वाघे, चन्द्रा पवार, मनीषा पवार आदी. शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…