मुंबई
Panvel News : पत्रकाराच्या तत्परतेमुळे सापडलेला मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन
•युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पनवेल तालुका आघाडी अध्यक्ष जितिन शेट्टीने सापडलेला मोबाईल पोलिसांकडे स्वाधीन पोलिसांनी मूळ मालकाला शोधून मोबाईल सुपूर्त
पनवेल :- पत्रकाराच्या तत्परतेमुळ सापडलेला मोबाईल मूळ मालकाला पोलिसांच्या माध्यमातून स्वाधीन करण्यात आले आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पनवेल तालुका आघाडी अध्यक्ष जतिन शेट्टी यांना घनसोली ते पनवेल या दरम्यान लोकल ट्रेन ने प्रवास करत असताना मोबाईल फोन सापडला. त्यावेळी पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यात जितिन शेट्टी यांनी पोलिसांच्या स्वाधीन केला.
पोलिसांनी मोबाईल मालकाला सोडून काढून तो मोबाईल पुन्हा मूळ मालकाला स्वाधीन केला. पत्रकाराच्या तत्परतेमुळे हरविलेला मोबाईल मूळ मालकाच्या हाती स्वाधीन झाल्यानंतर प्रशासनाकडून जितीन शेट्टी यांचे कौतुक करण्यात येत आहे.