Panvel News : पळास्पे फाट्यावर शिवसागर स्वीटस अनधिकृत दोनदा तोडूनही हॉटेलचालकांची मनमानी सुरु
•शिवसागर हॉटेल आणि स्वीट च्या मालकांविरोधात कडक कारवाई करण्याची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पनवेल तालुका अध्यक्षांची मागणी
पनवेल महाराष्ट्र मिरर : सिडको, नैनाची अधिकृत परवानगी नसताना अतिक्रमण करीत शिवसागर हॉटेल आणि स्वीटसच्या मालकाने आपले दुकान मांडले आहे. हॉटेलला अनधिकृत ठरवत याआधी दोनदा कारवाई करण्यात आली तरीही मालकाची मनमानी सुरुच असल्याने अधिका-यांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पळास्पे फाट्यावर उडडाणपुलाखाली गोवा रोडवर शिवसागर स्नॅक्स नावाने हॉटेल सुरु आहे. अनधिकृत असूनही सिडकोचे अधिकारी संगनमताने त्याला पाठबळ देतात. बऱ्याच लोकांनी या हॉटेलबाबत तक्रार केली परंतु सिडकोच्या नैना विभागाचे अधिकारी भांगरे यांच्या आशिर्वादाने असे प्रकार सर्रास चालतात. यामुळे दिवसें दिवस अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामांची संख्या वाढत चालली आहे. याप्रकरणी जबाबदार अधिका-यांनी दखल घेउन कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघच्या युवा आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष जितिन शेट्टी यांनी केली आहे.