मुंबई
Panvel News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले 11 जणांचे जीव वाचविणार्या अग्नीशमन दलातील जवानांचा विशेष सत्कार
पनवेल : पनवेल शहरातील जय भारत नाका येथील अश्विनी साडीच्या बिल्डिंगमध्ये आग लागली होती त्यावेळी 11 जण अडकले होते पनवेल अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थिचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार पनवेल शहर शाखेतर्फे आज करण्यात आला.
शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, उपमहानगरप्रमुख अच्युत मनोरे, युवा सयेना जिल्हाप्रमुख पराग मोहिते, शहर संघटक राकेश टेमघरे, उपशहरप्रमुख सन्नी टेमघरे, विभागप्रमुख जुनैद पवार, अमित माळी, युवा सेनेचे साई सुरज पवार, तालुका संघटक प्रमिला कुरघोडे, शहर संघटक अर्चना कुलकर्णी, उपशहर संघटक उज्वला गावडे, विभाग संघटक अश्विनी देसाई, उपविभाग संघटक त्रिवेदी यांनी अग्नीशमन दलाचे अधिकारी बोडखे व सुर्यवंशी तसेच इतर जवानांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.