Panvel News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने पनवेलमध्ये शर्मिला ठाकरेंचा सत्कार
•महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल यांनी शर्मिला ठाकरे यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले
पनवेल :- विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील नागरिकांना अभिमानाची गोष्ट केंद्र सरकारकडून दिली आहे. ती म्हणजेच राज्यातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात केंद्र सरकारच्या कॅबिनेट मधील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष स्थापनेपासूनच राज ठाकरे यांनी ही मागणी लावून धरली होती. लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला म्हणजेच देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती.
राज ठाकरे यांच्या मागणीला यश आल्यानंतर राज्याभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे सत्कार करण्यात येत आहे. तसेच पनवेल तालुक्या मध्ये इंडियाबुल सोसायटी येथे मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील आणि इंडियाबुल सोसायटीचे अध्यक्ष साईनाथ डोईफोडे इंडियाबुल्स महिला अध्यक्ष यांच्या वतीने राज ठाकरे यांचे आभार मानण्यात आले तसेच शर्मिला ठाकरे यांचाही या कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला.
शर्मिला ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कामाला जोरदार कामाला लागून आपला उमेदवार निवडून आणा असे सांगून कार्यकर्त्यांना विधानसभाच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.