पनवेल महाराष्ट्र मिरर : सख्ख्या भावासह पत्नी व दोन मुले बेपत्ता झाल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असली तरी या घटनेमुळे वावंजे परिसरात खळबख उडाली आहे.
वावंजे येथील भारत कंपाऊंडजवळ राहणारे रंजित यादव यांचा लहान भाऊ रुपेश यादव (34) उंची 5 फुट 7 इंच रंग सावळा, केस काळे, नाक सरळ, बांधा मजबूत असून अंगात पांढर्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट तसेच सोबत मोबाईल फोन आहे. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी गीनादेवी यादव (30) उंची 5 फुट, केस काळे लांब, वर्ण गोरा, बांधा मध्यम, नाक सरळ, डाव्या बाजूला नथ असून अंगात लाल रंगाचा ब्लाऊज व निळ्या रंगाची साडी, सोबत मोबाईल फोन आहे. त्याचप्रमाणे त्यांचा 12 वर्षाचा रवि हा मुलगा उंची 3 फुट, बांधा सडपातळ, नाक छोटे, केस काळे असून, अंगात पांढर्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व करड्या रंगाची कार्गो पॅन्ट तसेच 11 वर्षीय राधिका ही मुलगी उंची 2 फुट 8 इंच, वर्ण गोरा, केस काळे लांब, नाक सरळ, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा झगा घातलेला आहे. हे चौघेही राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याने ते हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन नं.022-27452444, मो.नं.9594434999 किंवा सहा.पो.उप.मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…