Panvel News : “पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार 2024” कार्यक्रमाचा वृत्तांत
पनवेल : 1 जुलै 2024 रोजी DOCTORS- DAY चे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात तसेच विख्यात अशा सर्व डाॅक्टरांच्या सन्मानार्थ पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार असा एक सोहळा भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह’ येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला महानगरपालिका उपआयुक्त डाॅ. श्रीयुत वैभव विधाते प्रमुख पाहूणे म्हणून लाभले होते.
भाविप प्रांत अध्यक्ष श्री. सिमंत जी प्रधान तसेच प्रांत सचिव श्री. नितीन जी कानिटकर कार्यक्रमाला उपस्थित होते.पनवेलमधील ख्यातनाम जनरल प्रॅक्टिशनर डाॅ. श्रीनिवास वाळींबे, शल्यचिकित्सक डाॅ. जगदीशचंद्र घोडके, व बालरोगतज्ज्ञ डाॅ. मिलिंद नाडकर्णी यांना ” पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.शाल, श्रीफळ, मानपत्र व आरोग्य देवता धन्वंतरीची मुर्ती हे पुरस्काराचे स्वरूप होते. पनवेलमधील वेगवेगळ्या विषयांतील प्रविण 160 डाॅक्टर्स, पनेवलमधील प्रतिष्ठित नागरीक तसेच भाविप सदस्य, असे एकूण 300 जणांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला उपस्थित 160 डाॅक्टर्स ना देखीलं मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी भाविप सदस्यांनी सर्व उपस्थित डाॅक्टरांच्या मनोरंजनार्थ स्वरचीत “मधुमेहावर बोलू काही….” या आगळ्या वेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
भारत विकास परिषद पनवेल शाखेचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच हितचिंतक सहकारी यांच्या सहयोगातून कार्यक्रम यशस्वी ठरला.