पनवेल जितिन शेट्टी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने व पक्षाचे विधिमंडळ गटनेते मा. श्री. डॉ जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई विभागातील खारघर येथील रमझान शेख Ramzan Shaikh यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्यालय पाचपाखाडी ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव ही महत्वाची जबाबदारी देत नियुक्ती करण्यात आली.
आपल्या पक्षाचे आधारस्तंभ आ. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्यांमधून प्रेरणा घेऊन तसेच आ. जितेंद्र आव्हाड साहेब यांची राजकारणातील स्पष्ट भूमिका, जनसामान्यासाठी असलेली त्यांची आपुलकी यातून प्रेरणा घेऊन पक्षासोबत राहून जनसेवेसाठी जीवन अर्पित करण्याचे निर्धार करतो. तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी डॉ जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी रमझान शेख यांनी दिली.
याप्रसंगी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री सुहास भाई देसाई आणि खारघर विभागातील कार्यकर्ते अमीर शाह मिरु, जावेद सय्यद, वाजिद शेख , अश्रफ खान तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…