मुंबई
Panvel News : परंपरा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने रक्षाबंधन आश्रम मध्ये साजरा
पनवेल जितिन शेट्टी :-राखी हा सन बहिण-भावाचा असून आपल्याला राखी पौर्णिमेला बहीण रक्षणाचा प्रतीक म्हणून हाताला राखी बांधते. Rakhi Bandan राखी पौर्णिमा निमित्त असाच उपक्रम घेत खारघर येथील जीवन ज्योती आश्रमात राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाजसेविका चंचला बनकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित परंपरा समाज सेवा संघटनेच्या महिला भगिनींनी आश्रमातील घरापासून बेघर असलेल्या भावांना राखी बांधून त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला परंपरा समाज सेवा संघटनेच्या अध्यक्षा तथा खारघर शिवसेना शेअर प्रमुख चंचला बनकर, नूतन गायकवाड, मीरा वीर, वेदिका रेडिज, ज्योती बागले , जयश्री सुखटणकर आदी उपस्थित होते. Panvel Latest News