Vasai Crime News : मोबाईल चोरीच्या वादातून हॉटेल चालकाची हत्या; नायगाव पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली

Vasai Latest Crime News : मालजीपाडा येथे ‘यादव ढाबा’वर घडली घटना; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू
वसई :- नायगाव पूर्वेकडील मालजीपाडा येथे मोबाईल चोरीच्या किरकोळ वादातून एका हॉटेल चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Vasai Latest Crime News या प्रकरणी नायगाव पोलिसांनी Naygaon Police आठ आरोपींना अटक केली आहे. अजित यादव (वय 26) असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी मालजीपाडा येथील ‘यादव ढाबा’वर सात ते आठ तरुणांचा गट जेवण करण्यासाठी आला होता. याच दरम्यान, मोबाईल चोरीच्या एका जुन्या वादावरून त्यांचा हॉटेल चालक अजित यादव यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी आरोपींनी लाकडी दांड्याने अजित यादव यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये अजित गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या विवान रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी Naygaon Police तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील सिंग (25 वय), प्रदीप यादव (23 वय), शिवम यादव (20 वय), कार्तिक साई कुनक (19 वय), सूरज पाल (21 वय), महेश यादव (22 वय) आणि राजन मौर्या (22 वय) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल.



