Panvel News : अनधिकृत फेरीवाल्यांवर, व्यवसायिकांवर महापालिकेची तोडक कारवाई
पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानूसार आज चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात आली.
खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरांमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग समिती कामोठे अंतर्गत आठवडा बाजार , हातगाड्या फुटपाथवर करवाई करणेत आली.
प्रभाग समिती अ उपविभाग नावडे अंतर्गत घोट येथील अनाधिकृत बाजांरांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले व बाजार बंद करण्यात आला. या कारवाईवेळी प्रभाग अधिकारी तथा साहय्यक आयुक्त स्मिता काळे प्रभारी अधीक्षक अमर पाटील उपस्थित होते.
याबरोबरच कळंबोली शहरामधील रस्यांितवर, फूटपाथवर, अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांवर कारवाई अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून सामान जप्त केले.तसेच पनवेलमधील शहरातील रस्त्यांवरती आणि फूटपाथवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.