Panvel News : नाना पटोले यांच्या कृत्याचा पनवेलमध्ये जाहीर निषेध
पनवेल : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये आज भाजपच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा व युवा मोर्चाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीता पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, दिपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्निल खबाले ,वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याने फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धूत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंडघशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल्या.