उरण : हिंदू संस्कृतीचे पारंपारीक सण मंगळागौर सण आजच्या धावपळीच्या युगातही प्रकर्षाने साजरे होताना पूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळते.उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथील प्रजापती म्यॅगनम वसाहत मध्ये मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नित्य नियमित होणारे महिला अत्याचार, बलात्कार यावरून धार्मिकता आणि हिंदू संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे काळाला अनुसरून संस्कार आणि संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. याउद्देशाने मंगळागौरचे आयोजन प्रजापती म्यॅगन इमारती मध्ये करण्यात आले. गौरीच्या रूपात पेहराव, साज श्रुगार करून गौरीचे पूजा समूह नृत्य, झिम्मा, विविध फुगडी प्रकार , पिंगा, सासू सुनेचे भांडण, नाच ग घुमा, घागर घुमू दे, या पारंपारीक नृत्याने वसाहत दुमदूमली होती.
मंगळागौर सणामुळे मैत्रीचे स्नेहधागे बांधून एक संस्कृतीचा वसा पुढच्या पिढीला साकार केला गेला . यावेळी या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.सहभोजनाचा आस्वाद घेत मंगळागौर कार्यक्रमाच्या रूपरेषेची सांगता झाली.अशा प्रकारे प्रजापती म्यॅग्नम महिला समूह आयोजित मंगळागौर सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…