पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी पथकाने सदर ठिकाणी जावून अत्यंत शिताफीने एका इसमास ठार मारुन तर त्याच्या सहकार्यास जीवंत पकडून ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी सदर घटना ही पोलिसांचेच मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले.
शहरातील बेथ एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन क्युआरटीच्या माध्यातून राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वपोनि संजय पाटील, पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अग्नीशमन दल, रुग्णवाहिका इतर अत्यावश्यक सेवा, 7 पोलीस अधिकारी व 57 कर्मचारी यात सहभागी झाले होते.
या ऑपरेशन दरम्यान सदर ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी इसमांपैकी एकाला ठार मारण्यात आले तर एकास जीवंत पकडण्यात आले. त्याची बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्याच्याकडील शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला. आतमध्ये कोणालाही जखमा झाल्या नाहीत, अशी माहिती पोलीस अधिकार्यांकडून देण्यात आली व सदर ऑपरेशन हे यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…