Panvel News : जागतिक शिक्षक दिनी मुलीची आई वडिलांना अनोखी भेटपनवेलच्या सिद्धी ठाकूरची वैद्यकीय क्षेत्रात सुवर्ण भरारी
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/10/678532c6-18f4-4f32-933f-6d79bdf3cf39-706x470.jpeg)
पनवेल : नवरात्रीच्या पवित्र Navratri Ustav उत्सवात पनवेलची रणरागिणी सिद्धी ज्ञानेश्वर ठाकूर हिने जागतिक शिक्षक दिनीच Teacher Day Gift शिक्षक असलेल्या आपल्या आई-वडिलांना डॉक्टरेट पदवीची DR Degree अनोखी भेट देऊन मातापित्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे .मुलीने मिळवलेल्या आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील यशाने सिद्धी ठाकूरचे Siddhi Thakur आई-वडीलही पुरते भारावून गेले आहेत .आपल्या गुणवान बुद्धिमान मुलीचे पदवीदान सोहळयास बेंगलोर येथे उपस्थित राहून सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे स्वप्नही सिद्धीच्या आई-वडिलांनी पूर्ण केल आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केल्याबद्दल सिद्धी ठाकूरचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. Panvel Latest News
ज्ञानेश्वर ठाकूर व शुभांगी ठाकूर हे दोघेही ज्ञानदानाचे काम शिक्षकी पेशातून गेले पंचवीस वर्षापासून करीत आहेत. त्यांची मुलगी सिद्धी ठाकूर हिला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तिच्या आई-वडिलांनी कर्नाटकामधील वैद्यकीय महाविद्यालयात तिचा प्रवेश केला . आई-वडिलांपासून कर्नाटक राज्यात राहून तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. वैद्यकीय शिक्षणातील प्रत्येक वर्षी तिथे मेहनत घेऊन परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रातील अखेरचीही पदवीही तीने चांगल्या गुणांनी संपादित केली आहे. सिद्धी ठाकूर ने मिळवलेल्या अपूर्व यशाने माता पीतांच्या श्रमाचे सोने झाले असल्याची भावना सिद्धीचे आई शुभांगी ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. आपल्या मुलीने मिळवलेल्या यशाचे कौतुक कर्नाटकातील महाविद्यालयात पदवीदान सोहळ्याप्रसंगी होत असताना सिद्धीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. तिच्या यशाने आई-वडिलांसह त्यांचे पूर्ण कुटुंबीय भारावून गेले आहेत. सिध्दी च्या यशाचे कौतुक सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करून केलं जात आहे. Panvel Latest News