पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Muncipal Corporation ड विभागात अनधिकृत बांधकामांना थेट अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीतील हॉटेल सागर पॅलेसला लागून असलेल्या कुसुम ट्रॅव्हल या एअर कंडीशन बुकिंग ऑफिसने नियमबाह्यपणे जी जी भिंत उभारली आहे. या भिंतीची उंची पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.
याच परिसरात युनियन बँकेला लागून असलेले मोबाईल दुकानही अनधिकृतपणे उभारले गेले आहे. स्थानिकांनी या बांधकामांविरोधात तक्रारी नोंदवल्या असूनही, पालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे ड विभागातील अधिकाऱ्यांचे धनदांडग्यांशी काही हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
“आम्ही वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केल्या, पण प्रत्येक वेळी आमच्या अर्जांकडे दुर्लक्ष केले जाते. धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ड विभागातील अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर कधी कारवाई करणार, की धनदांडग्यांना पाठिशी घालणे सुरूच राहणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांना आता पालिकेच्या कारवाईची प्रतीक्षा आहे, पण जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हा वाद कायम राहण्याची शक्यता आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…