मुंबई
Trending

Panvel Fire News : पनवेल शहरातील टपाल नाका एम जी रोड येथील दोन दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

पनवेल : पनवेल शहरातील टपाल (Panvel Tapal Naka) नाका एम जी रोड येथील २ दुकानांना आज सकाळी अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. Panvel Burhani Traders Fire News
शहरातील एम जी रोड येथील हुसेनी ट्रेंड्स या दुकानाला आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली. याबाबतची माहिती दुकान मालकाला परिसरातील नागरिकांनी कळविली तसेच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलीस ठाण्याला (Panvel Police Station) कळविण्यात आले. दरम्यान ही आग आतून पसरत बाजूला असलेल्या बुऱ्हानी ट्रेंड्स या दुकानाला सुद्धा आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन बबांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयाच्या मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. Panvel Burhani Traders Fire News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0