Panvel News : मुंबईच्या बाबा ग्रुपने ‘त्या’ मृत मजुराच्या अनाथ कुटुंबाची जबाबदारी घेतली!

गरीब कुटुंब, ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दिला दिलासा..!
पनवेल जितिन शेट्टी :- अंतुर्ली खुर्द येथील जुबेर पठाण हा तरुण तारखेडा येथे कपाशी भरण्यासाठी गेला असता दुसऱ्या व्यापाऱ्याने गाडी मागे-पुढे घेण्याच्या वादात त्या तरुणाच्या डोक्यात फरशी मारून गंभीररित्या जखमी केले होते. जखमी जुबेरचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. यामुळे पठाण कुटुंब अनाथ झाले असून या कुटुंबाची पुढील जबाबदारी मुंबईच्या बाबा ग्रुपने घेतली आहे. Baba Group Panvel दरम्यान, याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये Pachora Police Station त्या व्यापाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मयत जुबेर पठाण यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. त्यातच घरातील करत्या व्यक्तीचा खून झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी पठाणच्या कुटुंबाची बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी भेट घेत सांत्वन केले.जुबेरचे लहान मूल बघून, घरची परिस्थिती बघून बाबा यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी बाबा ग्रुप संस्थापक नंदू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.तसेच व्यापाऱ्यांनी आपल्याकडे कामास असलेला मजूर असो वा दुसऱ्याकडील कामगार असो, त्यांच्याबरोबर सौजन्याने वागा, स्वार्थासाठी हाणामाऱ्या करु नका. जर जुबेर पठाणला जळगाव जिल्ह्यातून योग्य न्याय मिळत नसेल, तर मी उच्च न्यायालयात येथे स्वखर्चाने लढेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.