Panvel News : महेंद्रशेठ घरत दूरदृष्टी असणारा नेता
उरण प्रतिनिधी जितीन शेट्टी : कोपर व शेलघर -गव्हाण अंडरपासचे काम पूर्णत्वा कडे! सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास होत असतांना स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच उरण लोकल चालू झाल्यामुळं गव्हाण व कोपर वरून शेलघरला जाताना वळसा घालून प्रवास करावा लागत होता कारण रेल्वे प्रशासन अंडरपास देत नव्हते.
परंतु खरोखरच दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी रेल्वे प्रशासन व सिडको प्रशासन यांचा पिच्छा पुरवून वेळप्रसंगी दबावतंत्र वापरून पहिल्यांदा कोपर ते शेलघर अंडरपास मंजूर करून रस्ता सुरु झाला तर आता गाव्हण ते शेलघर अंडरपास मंजूर करून दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांना हा रस्ता वापरण्यासाठी खुला होऊ शकेल. यामागे दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत या मार्गांवर पायावट करून भविष्यातील नगरिकांच्या गरजेची जाणीव करून दिली होती. आज त्यांच्या या दूरदृष्टीमुळे प्रत्येक गावात मंदिरे, रस्ते, गटारे, समाजमंदिर, शाळा, मैदाने करण्यात यश मिळाले आहे.नागरिकांचा वळसा घालून अतिरिक्त प्रवास वाचल्यामुळे गव्हाण, कोपर, शेलघर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.