Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदास पाटील यांचे जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांना निवेदन केली ही मागणी
•कॉरिडॉर रस्ता या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना 22 लाख रुपयांची पर गुंठा मागणी
पनवेल :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना निवेदन देत एम एस आर टी सी अंतर्गत येणाऱ्या कॉरिडॉर रस्त्यासाठी गुंठ्या मागे 22 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले आपल्या निवेदनात?
मनसे पनवेल तालुका आमच्याकडे शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर आम्हाला देखील या दूविधा अवस्थेमध्ये खूप मोठी तफावत दिसून आली, कारण अलीकडे ब्राह्मण करवले गाव, ठाणे जिल्हा या हद्दीतील 22 लाखाचा भाव दिला जातो, तर दुसरीकडे नितलस, निताले, या गावाला लागूनच वावंजे गाव, आहे, त्या गावाला देखील 22 लाख रुपये पर गुंठा आपण भाव दिला आहे, ब्राह्मण करवले आणि वावंजे या दोन्ही गावांच्या मधोमध असलेले नितलस निताले या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे, कारण 9 जुलै 2020 चा खरेदीखत नितळस, निताले, आमच्या शेतकऱ्यांकडे पूर्ण दस्तावेज 450000 आजार पर गुंठा हा व्यवहार झालेला आहे, असं असताना आपलं प्रांत कार्यालय चुकीच्या निर्णयाकडे जात आहे या शेतकऱ्याने योग्य तो भाव मिळून द्यावा कारण सर्वांनाच माहित आहे त्या ठिकाणी कोणता भाव चालू आहे, प्रांत कार्यालयाने चुकीचे निर्णय मुळे या अगोदर सोडून गेलेले प्रांत मुंडके यांच्यावर अनेकदा लोकांच्या तक्रारी विधान परिषदेमधील तक्रारी जाहीर झालेले आहेत, मनसे पनवेल तालुका वतीने जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, दत्तप्रसाद नडे , अप्पर जिल्हाधिकारी महाव्यवस्थापक (भूमी) MSRDC, आपणाकडे विनंती आहे, या विषयांमध्ये बारकाईने लक्ष घालून आपण त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जाचा भाव करून द्या, कारण भूसंपादन भाव ठरवण्याचा दर्जा आपल्याकडे आहे, आणखी किती दिवस शेतकरी संघर्ष करणार, अशी आशा बालगतो अन्यथा ते शेतकरी कोणत्याही व्यवस्थापनेला आपली जमीन हस्तांतर करू देणार नाही, आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करेल, म्हणूनच आपल्याला विनंती आहे की आपण पर गुंठा 22 लाखाचा भाव शेतकरी बांधवांना देण्यात यावे.