मुंबई

Panvel News : प्रेमाचं रुपांतर सुडात! पत्नीच्या खुनासाठी पतीचीच सुपारी – उलवा खून प्रकरणाचा थरारक उलगडा!

•ती फक्त 27 वर्षांची होती… पतीनेच रचली तिच्या अंताची कटकारस्थान,पत्नीच्या खुनासाठी पतीची 6 लाखांची सुपारी – उलवा हत्याकांडाचा थरारक उलगडा

पनवेल (उलवा) :- उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २७ वर्षीय महिलेच्या निर्घृण खुनाचा तपास करत असताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अलविना किशोर खंगार सिंग या महिलेचा खून तिच्याच पतीने 6 लाख रुपये सुपारी देऊन करवून घेतल्याचं समोर आलं आहे.
ही घटना 18 मे 2025 रोजी उलवा येथे घडली होती.अलविनाचा पती किशोर सिंग यानेच “अज्ञात इसमाने खून केला” असा खोटा देखावा निर्माण करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड तपासणी, आणि कौशल्यपूर्ण सखोल चौकशीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा उलगडा केला.

गुन्ह्याचं सूत्र असं उलगडलं

तपासात समोर आलं की, पती किशोर सिंग याने अलिशा त्यागी आणि चरणजित कौर या दोन महिला साथीदारांमार्फत दोन सुपारी गुन्हेगारांना उत्तरप्रदेश व पंजाब येथून बोलावलं. अलविना हिचा गळा कापून खून करण्यात आला. ही संपूर्ण सुपारी 6 लाख रुपयांमध्ये दिली गेली होती.

अटक आरोपींची नावे:
1.किशोर सिंग खंगारसिंग राजपूत (30 वय)
2.अलिशा धनप्रकाश त्यागी (38 वय), गाझियाबाद, उत्तरप्रदेश
3.चरणजित फतेसिंह कौर उर्फ डिंपल (34 वय), अमृतसर, पंजाब

सर्वांना 21 मे रोजी अटक करण्यात आली असून, 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुपारी घेणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

हा गुन्हा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर आयुक्त दीपक साकोरे, उप आयुक्त प्रशांत मोहिते, आणि सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणण्यात आला. तपासात पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे व गुन्हे शाखेचे अधिकारी सहभागी होते.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago