Panvel News : कराटे चॅम्पियनशिप पेंधर येथे संपन्न..

पनवेल जितिन शेट्टी : इंडियन मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पहिली ओपन कराटे चॅम्पियनशिप रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी एम.बी.एम. गोल्डन स्कूल पंधर येथे श्री बंडू शंकर पाटील (अध्यक्ष इंडिया), शैलेश सिताराम ठाकूर (अध्यक्ष महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संतोष साळुंखे (मुंबई पोलीस एटीएस), लक्ष्मण कोपरकर (क्राईम ब्रँच नवी मुंबई), भरत म्हात्रे (चेअरमन एम.बी.एम. गोल्डन स्कूल), दीपेश सोलंकी (किकबॉक्सिंग रायगड सेक्रेटरी), सारिका पवार (मुख्याध्यापिका प्रयेश स्कूल), डॉ. अशोक म्हात्रे (पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष), मिलिंद खारपाटील (संपादक महामुंबई चॅनल),लालचंद यादव (टी.व्ही.१ इंडिया डायरेक्टर),पत्रकार जितिन शेट्टी (महाराष्ट्र मिरर),सचिन घाबडी (उपसरपंच चिरनेर) आवेश शेख, (होंडा मॅनेजर) अर्फत शेख, (स्पोर्ट्स पर्सन), प्रभाकर भोईर, अक्षय जाधव, संतोष मोकल, अमोल जाठोत, शुभम म्हात्रे, योगेश पाटील, उद्योजक प्रकाश निघुकर, समाजसेवक महेश भोईर, रुपेश निघुकर, यादव कोपरकर, संजय कोपरकर, मनोहर कोपरकर, वैभव म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, जितेश भोईर, हरेश भोईर, अंकुश कोपरकर, अभिमन्यू पाटील, देविदास भोईर, सचिन कोपरकर, राम कोपरकर, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कळंबोली, खारघर, कामोठे, पलस्पे, पेंधर, विच्चे या भागातील तब्बल ३८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून अभिषेक सिंग, सानिका ठाकूर, सलोनी ठाकूर, भूमीजा पांडे, रिया सूर्यवंशी, दिव्या पाटील, रिताशा सुर्वे, पियुष धायगुडे, ऋतुजा माळी, मानसी गोरे, पांडुरंग अलदार, श्रुतिका सोनावले, हिमनीश पांडे, ओमकार गोरे, हर्षद पाटील, अनुज नलावडे, आर्यन शेखावत, सोहम भावर, साहिल खान, सोहेल खान, सार्थक नवले, शंभूराजे येडगे, राशी शेखावत, अवंतिका कदम, ऋतुजा बोरकडे, श्रेया सोनावले, या सर्वांचा सहभाग होता. नियमांचा काटेकोरपणे पालन करून या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. या स्पर्धेसाठी, अविनाश जाधव, चंद्राबाई ठाकूर, सुचिता पाटील, स्नेहल ठाकूर, पियुष पाटील, ऋतुजा पाटील, वेदिका पाटील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.