Panvel News : पनवेलच्या NIFD संस्थेच्या Tvastr प्रदर्शनात नाविन्यपूर्ण कलाकृतींचा नजराणा
Panvel NIFD News : आंतराष्ट्रीय दर्जाच्या डिझायनर कनिका बावा यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उदघाटन
पनवेल | जितीन शेट्टी : प्रदर्शनात पोशाख, फॅशन, लाइफस्टाइल ऍक्सेसरीज, टेक्सटाईल डिझाइनचे नाविन्यपूर्ण नमुने NIFD Panvel हे पनवेलमध्ये असलेले सर्वोत्तम फॅशन डिझाइन आणि इंटिरियर डिझाइन कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. फॅशन जगतात अनेक उद्योजक व व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टीकोनातून, NIFD कॉलेजमध्ये फॅशन डिझाइन कोर्स आणि इंटिरियर डिझाइन कोर्स करून विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. NIFD पनवेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉर्डेन तसेच पारंपरिक कपडे, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले इंटेरियर तसेच इतर अनेक नावीन्यपूर्व डिसाइन्सची प्रदर्शन व विक्री दिनांक २२ जून व २३ जून या कालावधीत करण्यात येत आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी ०७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. Tvastr (त्रवस्त्र) असे या प्रदर्शन कार्यक्रमाचे नाव असून फॅशनची आवड जोपासण्यासाठी हा सर्वसमावेशक कार्यक्रम NIFD संस्थेमार्फत राबवण्यात आला आहे. पोशाख डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, लाइफस्टाइल ऍक्सेसरी डिझाइन आणि टेक्सटाईल डिझाइनमधील नाविन्यपूर्ण नमुने या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या प्रदर्शनासोबतच या वस्तूंची विक्री देखील याच ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती NIFD संस्थेचे संचालक सुरिंदर सिंग यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे आवाहन सुरिंदर सिंग यांच्यामार्फत करण्यात आले. Panvel News
या प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक २२ जून रोजी मोठ्या थाटात करण्यात आले. आपल्या डिसाइन्सद्वारा लिम्का बुकमध्ये ३ वेळा नाव नोंदवणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंटेरियर डीजायनर कनिका बावा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. कनिका बावा यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व डिसाइन्स पाहून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच NIFD संस्थेने विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतकी मोठी संधी दिल्याबाबत संस्थेचेही कौतुक केले. Panvel News