पनवेल (जितिन शेट्टी) : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
उद्योजक अविनाश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ॐ दत्त परिवाराचे निनादानंद महाराज, वक्ते इंद्रजित देशमुख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सरपंच अर्चना कोरे, मुख्याध्यापक दीपक महापरळे, माजी विद्यार्थी भरत माने, सुरेश माने, नितीन माने, मंगेश माने, अशोक पवार, संजय जाधव अविनाश जाधव, लक्ष्मण माने, हेमंत माने आदी उपस्थित होते.
यशवंत हायस्कूलच्या इमारत डागडुजीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वी १० लाख रुपये देणगी दिली होती. त्याचप्रमाणे उर्वरित कामांसाठी रविवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आणखी पाच लाख रुपये देणगी जाहीर केली. याबद्दल संस्था तसेच हायस्कूलच्या वतीने त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…