Panvel News : रोज झगमगणाऱ्या वडाळे तलाव परिसरात आज तीन वाजल्यापासून बत्ती गुल… शिवसेनेच्या चंद्रशेखर सोमण यांच्या समन्वय व पाठपुराव्याने विद्युत पुरवठा रात्री नऊ वाजता पूर्ववत…
पनवेल : १ जून दुपारी तीन वाजल्यापासून वडाळे तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता व संध्याकाळी सहा सात नंतर रोज झगमगणारा वडाळे तलाव परिसर काल अंधारात बुडून गेला. दुपारपासून झालेल्या या समस्येकडे कोणाचाही लक्ष नसताना तिथे फिरायला गेलेल्या शिवसेनेचे स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांच्या लक्षात नागरिकांनी ही गोष्ट आणून दिल्यावर महानगरपालिकेचे विद्युत पुरवठा अधिकारी व सल्लागार श्री बि आर कदम यांना फोन करून या घटनेची माहिती दिली व त्यांनी त्वरित या घटनेला वडाळे तलाव जवळील ट्रान्सफरमरचा ‘डी.ओ’ खराब झाल्याने ही समस्या उद्भवली असे सांगितले.
सोमण यांनी लागलीच त्वरित महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता सहाय्यक अभियंता किशोर पाटील हे त्वरित आपला लाईनमनच्या स्टाफसह जागेवर उपस्थित झाले. तिथे उपस्थित महावितरणचे कर्मचारी श्री सानप, श्री राठोड व श्री मते यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करत दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर नवीन डी.ओ ट्रान्सफॉर्मर मध्ये बसवून वडाळे तलाव व आसपास परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. यावेळेस श्री सोमण हे स्वतः दोन तास प्रत्यक्ष जागेवर कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून महापालिका व महावितरण यांच्यात यशस्वी समन्वय साधला व झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत स्वतःच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजता हा विद्युत पुरवठा पूर्ववत करून दिला. तेथील नागरिकांनी महावितरणचे सर्व अधिकारी व शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांचे आभार मानले.