Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगरपालिकेवर हॅंडीकॅप मोर्चा
•Panvel News महानगर गॅसच्या पाईपलाईन मुळे झालेल्या खड्ड्यात बाबत मनसेचे आक्रमक, पनवेल महानगरपालिकेवर धडक मोर्चा
पनवेल (जितीन शेट्टी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पावसाळ्यात विविध मुद्द्यांवरून वेगवेगळ्या महानगरपालिकेवर मोर्चा काढत असताना दिसत आहे. मुंबई साचलेल्या पाण्यामुळे कांदिवली मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी साठलेल्या पाण्यात पाण्याचे ट्यूब सोडून आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (11 जुलै) अनोखा आंदोलन करत हॅंडीकॅप मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी केले आहे.
महानगर गॅसने गॅसपाईपलाईन टाकण्यासाठी पनवेल महानगरातील सर्व रस्ते खोदुन ठेवले… त्यांना वरवरच मोठ्या खडीने भरले. हे भरलेले रस्ते आता खचायला लागले आहेत. या खड्ड्यांमद्धे शाळेतली मुले, महिला, बाईकस्वार पडायला लागले आहेत. अपघात वाढले आहेत. पावसाळ्यापुर्वी हे रस्ते पुर्ववत करण्याचे काम महानगरपालिकेचे होते. पण मनपा ढिम्म राहिली. याचा निषेध म्हणुन पनवेल मनसे महानगर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात हा हँडिकॅप मोर्चा निघाला.