पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Municipal Corporation मुख्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर गुरूवार रोजी ‘ वीर बाल दिवस ’ Bal Veer Divas निमित्ताने गुरू गोविंदसिंगांच्या पुत्रांसहित असलेल्या Guru Govind Singh प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Panvel Latest News
यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी ,महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Panvel Municipal Corporation Latest News
दहावे शीखगुरू गोविंदसिंग यांचे पुत्र श्री.जोरांवरसिंह व श्री.फतेसिंह यांचे वय 9 व 6 वर्ष असताना शीख संप्रदायाचा सन्मान,अस्मिता हेतू रक्षणार्थ त्यांनी हौतात्म्य पत्करले. याचीच आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.