पनवेल : करंजाडे येथे प. पू. गगनगिरी महाराज आणि स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशीर्वादाने श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा 8 ते 10 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती आयोजक विनोद साबळे यांनी दिली.करंजाडे येथे स्व. सदाशिव साबळे यांनी प. पू. गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 मध्ये श्री दुर्गामाता मंदिराची स्थापना केली होती. 25 वर्षांनंतर मंदिर जीर्ण झाल्याने साबळे परिवाराने जिर्णोद्धाराचा निर्णय घेतला. या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
१. 8 ऑगस्ट 2025 : गणेश पूजन, पुण्याह वाचन आणि नामस्मरणाने सोहळ्याची सुरुवात.
२. 9 ऑगस्ट 2025 : सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होम हवन, सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत देवीची दिंडी मिरवणूक. यावेळी आरिवली येथील गावदेवी भजनी भारूड मंडळाचे भजन होईल. रात्री 9 वाजता आदई येथील दत्त प्रासादिक भजन मंडळाचे संगीतमय भजन.
३. 10 ऑगस्ट 2025 : सकाळी 7 ते 9 वाजता गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण, सकाळी 11 वाजता महाआरती. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन. यावेळी चिंचवली शेकीन येथील माऊली भजन मंडळाचे भजन होईल.
हा भव्य सोहळा करंजाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडणार असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विनोद साबळे यांनी केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…