Panvel News: सरकार लोकशाहीची हत्या करून संविधानाच्या मूल्याचे पालन केले जात नाही ; हाजी शाहनवाज खान यांचा आरोप
पनवेल : नितेश राणे Nitesh Rane यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी नगर ते मुंबई तिरंगा यात्रा Mumbai Tiranga Yatra काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन नितेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई का केली जात नाही असा सवाल विचारणा करिता यात्रा काढण्यात आली आहे.माजी खासदार इम्तियाज जलील Imtiaz jaleel संविधान प्रमाणे आपल्या लोकशाहीतील हक्काने मुंबईत सरकार सोबत चर्चेसाठी येत आहेत. त्यांना प्रवृत्त करण्यासाठी सरकार जिवतोड प्रशासकीय डावपेच खेळत आहे. एकीकडे नितेश राणे सारखे हिंदू-मुस्लिम तणाव वाढवणारे वक्तव्य करत आहेत. त्यांना आवरणे सरकारला जमतच नाही. मात्र एक पत्रकारिते मधून निर्माण आमचं नेतृत्व सरकारला त्रासदायक वाटत आहे. खरंच हे सरकार संविधान विरोधी आहे असा घणाघात एमआयएम कोकण विभाग नेते हाजी शाहनवाज खान यांनी केला.
मुंबईत इम्तियाज जलील पूर्व नियोजना प्रमाणे आपलं म्हणणं मांडण्यासाठी येत आहेत. पण त्यांना ऐकण्यासाठी येणाऱ्या आमच्या समर्थकांना मुंबईत प्रवेश करून दिला नाही. हजारो लोकांना माघारी वळवण्यात आले. लोकशाहीत घटनेप्रमाणे आपण आपला न्यायहक्क मागु शकत नाही असली कसली लोकशाही असे देखील हाजी शाहनवाज खान म्हणाले.
नवी मुंबई तुर्भे भागात आज कोकणातून मुंबईत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना एमआयएम तर्फे पिण्याचे पाणी व फळ वाटप करण्यात आले.मुंबईकडे गेलेल्या कार्यकर्त्यांना फ्री वे मार्ग संपताच मुंबई पोलिसांनी आझाद मैदान येथे जाण्यास मनाई करून मागे फिरवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.