Panvel Latest Crime News : ‘बाळगृहात राहायचे नव्हते’ म्हणून 12 ते 17 वयोगटातील मुलींनी एक मजली इमारतीवरून घेतली उडी; अपहरणाचा गुन्हा दाखल.
पनवेल :- पनवेल येथील एका मुलींच्या बालगृहातून रविवारी पहाटेच्या सुमारास पाच अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बालगृहातून मुली बेपत्ता झाल्याची तक्रार व्यवस्थापनाने दिल्यानंतर, या मुलींचे वय 12 ते 17 वर्षे असल्याने पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा (फूस लावून पळून नेल्याचा) नोंदवत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने केलेल्या तपासामुळे काही तासांमध्येच त्यापैकी तीन मुलींना सुखरूप शोधण्यात यश आले आहे. Panvel Police Latest News
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बालगृहातून मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. केअरटेकरने ‘अनोळखी व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्या’ची तक्रार दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. Panvel Crime News
ग्रील कापून, पाईपवरून उतरून पलायन!
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालगृहात ‘मनाप्रमाणे राहायला मिळत नव्हते’ म्हणून या मुलींनी पळून जाण्याचे नियोजन केले. इमारतीच्या सभागृहातील खिडकीची लोखंडी ग्रील कापून त्यांनी बाहेरील पाण्याच्या टाकीवर उडी मारली. त्यानंतर शौचालयाच्या पाईपवरून घसरून त्या एक मजली इमारतीवरून खाली उतरल्या. पळून गेलेल्या मुलींमध्ये 12, 14, आणि 17 वर्षांची प्रत्येकी एक आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता.
शोधमोहिमेला यश
पनवेल शहर पोलिसांनी Panvel Crime News त्वरित रेल्वे पोलीस आणि मुलींच्या दूरच्या नातेवाईकांशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे पाचपैकी तीन मुली सापडल्या.
एक मुलगी उरण येथील चिरनेर येथे तिच्या मूळ गावी सापडली
दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथे रेल्वे पोलिसांना सापडली, तिला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे.
तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी गेल्याचे समजले असून, तिलाही नजीकच्या बालगृहात ठेवण्याची कार्यवाही सातारा पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे बालगृहातील अंतर्गत व्यवस्थेवर तसेच सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, बालक कल्याणकारी समितीच्या सदस्यांनीही बालगृहाला भेट देऊन चौकशी केली आहे. पनवेल पोलीस उर्वरित दोन मुलींचा कसून शोध घेत आहेत. यातील एक मुलगी उरण येथील एका प्रकरणातील पीडित आहे, तर इतर चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांचे पालक नसल्याने त्यांना या बालगृहात ठेवण्यात आले होते.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…