मुंबई
Panvel News : मंगळूरचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांचा पनवेल येथे भावपूर्ण श्रद्धांजली

पनवेल (जितीन शेट्टी) :- मंगळूर येथील बजरंग दलाचे हिंदू कार्यकर्ते आणि गोरक्षक सुहास शेट्टी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे पाहून 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पनवेल एसटी बसस्थानक विसावा हॉटेलसमोर समस्त हिंदू बांधव एकत्र आले आणि त्यांनी सुहास शेट्टी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.



हिंदू सामाजिक कार्यकर्ते गणेश शेट्टी आणि समाजसेवक जितिन शेट्टी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सुजित अण्णा कामोठे, राष्ट्रीय गौरक्षा वाहिनीचे अध्यक्ष राकेश, बजरंग दल सुरक्षा रायगड जिल्हाप्रमुख सुभाष, मुंबई बाबा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू पाटील, अरुण शेट्टी ,मुकेश उपाध्याय, गुरुनाथ मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते.


