Panvel News : भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची निवड !
उरण : देशातील 26 राज्यातील कामगार ,कष्टकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आणी त्यांना न्याय मिळवुन देणारी अखिल भारतीय संघटना म्हणजे ” भारतीय जनता मजदुर सेल ” होय.या सेलच्या माध्यमातून भारतातील 26 राज्यातील कष्टकरी ,कामगार, श्रमिकांच्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण करुन त्यांचे आयुष्य उज्वलीत करण्याचे काम ही सेल करते. महाराष्ट्र राज्यात सुध्दा या भारतीय मजदूर सेलचे कार्य गौरवास्पद असेच आहे, आणी आता या सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची निवड सोमाटणे येथील शिवगंगा वाटर पार्क या ठिकाणी पार पडली असुन, श्रीयुत अनंत पाटील हे आता महाराष्ट्र राज्याच्या भारतीय मजदूर सेलचे अध्यक्ष असणार आहेत.अनंत पाटील हे नाव कळसखंड गावच्या पंचक्रोशीत हभप महाराज तथा किर्तनकार म्हणून सुपरिचित आहेत, तर कळसखंड गावच्या रहिवाशी असणाऱ्या अनंत पाटील यांनी कळसखंड गावच्या उपसंरपंच पदाची धुरा यशस्वी सांभाळत ,विकासाची दुरदृष्टी,आणी अभ्यासु उपसरपंच म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. एकीकडे हभप महाराज तथा किर्तनकार व गावचे उपसरपंच पद भुषविलेल्या अनंत पाटलांची निवड महाराष्ट्र राज्याच्या भारतीय मजदूर सेलच्या अध्यक्षपदी होणे म्हणजे अनंत पाटील यांच्या कार्याचा गौरव असुन, अनंत पाटलांच्या रुपाने आता महाराष्ट्रातील मजदूर, श्रमिक, कष्टकरी वर्गाला न्यायच मिळेल अशा शब्दांत अनंत पाटलाच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. स्वतहा तळागळातील माणसांच्या सानिध्यात राहुन कष्टकरी कामगारांच्या आयुष्यातील समस्या जवळुन बघत त्या समस्यांची जाण असणाऱ्या अनंत पाटलांची निवड झाल्यामुळे कळसखंड व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारतीय मजदूर सेलचा सोमाटणे येथे पार पडलेल्या निवडीच्या भव्य कार्यक्रमासाठी भारतीय मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अर्णब चटर्जी ,भारतीय मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन श्री. बिस्वा प्रिया राय चौधरी,भारतीय मजदूर सेलचे राष्ट्रीय सेक्रेटरी तथा दक्षीण भारताचे इंन्चार्ज श्री.यश पोवार तसेच श्री दिपक पाटील महा, स्टेट जनरल सेक्रेटरी,मा श्री धनाजी शेठ ठाकुर,बबन मुकादम, सरपंच भातान तानाजी पाटील,महेश शेठ चोरमोरे, विजय पाटील, महादेव भगवान पाटील सरपंच आरीवली, महादेव पाटील उप सरपंच आपटे,तेजस्वीनी आत्माराम पाटील सरपंच सोमाटणे, सुनिल माळी सरपंच सावळे, सुरेश नाईक सदस्य, सौ.अस्मिता अनंत पाटील सदस्य, गणेश अरिवले, महेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य,यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भारतीय मजदूर सेलच्या या अध्यक्षपदाच्या निवडीच्या भव्य कार्यक्रमात सोमाटणे परिसरातील व अनंत पाटिल हे ज्या कळसखंड गावचे भुमिपुत्र आहेत त्या पंचक्रोशीतील शेकडो नागरिक, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतीय मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी अनंत पाटलांची निवड झाल्यामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.