Panvel News : धनश्री रेवडेकर यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मुंबई शहर महिला उपाध्यक्षपदी निवड
मुंबई : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश रामराव कचकलवार यांनी धनश्री शिवाजी रेवडेकर Dhanashree Ravdekar यांची मुंबई शहर महिला उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी वैध असणार आहे.
रेवडेकर यांनी महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहन आणि पत्रकारितेतील न्यायहक्कासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर रेवडेकर यांनी महिलांच्या समस्या सोडवणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि ग्रामीण पत्रकारितेला भक्कम आधार देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
संघटनेच्या नियुक्तीपत्रात पुढील कार्यकारिणी निवडून त्याचा अहवाल मुख्य कार्यालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, पदाधिकारी व इतर पत्रकारांनी रेवडेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, संघटनेच्या उद्दिष्टांसाठी त्यांनी भरीव कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.