मुंबई
Trending

Panvel News : खारघर येथील गोल्डन वाईन मार्टची परवानगी रद्द करण्याची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक

खारघर जितिन शेट्टी : खारघर येथील गोल्डन वाईन मार्टची परवानगी रद्द करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे. यासंदर्भात अधिक गांभीर्याने विचार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि खारघर संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली.
खारघरला नशामुक्त ठेवण्यासाठी खारघर संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबवत आहे. मात्र, गोल्डन वाईन शॉपमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी वाईन शॉपची मान्यता रद्द करावी, अशी ठाम मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, अधीक्षक रवी किरण कोले, उपअधीक्षक श्री. भूतकर, निरीक्षक श्री. बी. डी. फणसेकर तसेच खारघर संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0