मुंबई
Trending

Panvel News : पनवेल बदलाच्या ‘संकल्प सिद्धी’चे दिवस!

पाणी, रस्ते, मलमत्ता कर आणि भाजपा, शेकापच्या भ्रष्ट उमेदवारांना हाकलून लावण्याचेही हिच ती वेळ

जनमाणसांचा तीव्र आक्रोश उफाळून

पनवेल जितिन शेट्टी : राज्यात विधानसभा मतदार संघातून लोकप्रतिनिधी निवडीच्या प्रक्रियेचा एक भाग असलेल्या प्रचाराला ज्वर चढला आहे. पनवेल विधानसभा मतदान Panvel Vidhan Sabha संघात 15 वर्षे सापासारखे वेटोळे करून बसललेल्या प्रशांत ठाकूर आणि त्यांचाच विद्रुप चेहरा असलेल्या बाळाराम पाटलांचा Balaram Patil जनतेला तिटकारा आला असल्याचे नागरिक, मतदार उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत. मतदारांनी सक्षम पर्यायी उमेदवार म्हणून कांतीलाल कडू यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांची निशाणी असलेल्या सितार (वीणा) चा प्रचार शिगेला पोहचला आहे. लोकांना बदल हवाच आहे. त्यांनी केलेल्या संकल्प सिद्धीची घटिका समीप आली आहे. Panvel Latest News

188-पनवेल विधानसभा मतदार संघांचे लोकमुद्रा जनहित पार्टीचे उमेदवार कांतीलाल कडू kantilal Kadu यांची निशाणी असलेल्या ‘सितार’चा (वीणा) प्रचार जोरकसपणे सुरु आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात कांतीलाल कडू यांच्या सितारला विजयी बदलाचे संकेत मिळत आहेत. अनेक शहरात कांतीलाल कडू यांची सैनिकी फौज प्रचाराला लागली आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या 15 वर्षात शेकापने पनवेलकरांना वार्‍यावर सोडले. त्यामुळे शहरी मतदारांनी त्यांना उंबरठ्या बाहेर ठेवले आहे. आता पाळी भाजपाची आहे. मालमत्ता कर, पाणी प्रश्‍न, खड्डेयुक्त रस्ते, खंडित विद्युत पुरवठा यासह महापालिकेतील भ्रष्ट कारभार आणि गावोगावातील तरुणांना नशेले करण्यावर भर भाजपाने भर दिल्याने महिला वर्गातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
कांतीलाल कडू यांनी प्रचाराला प्रारंभ करुन विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधेरी आणली आहे. पनवेल मतदार संघातील 80 टक्के लोकांना बदल हवा आहे. यात भाजपासह सर्वपक्षीयांचा समावेश आहे. विशेषतः शेकाप राज्यातील आघाडीचा घटक पक्ष नसल्याचे उघड झाल्यानंतरही त्यांनी आघाडीचे उमेदवार असल्याची अफवा पिकवून कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे. परंतु, लोकांना फसवण्याचा त्यांचा प्रयत्न शेकापतील लोकांनाही आवडलेला नाही. शिवाय, पक्षातील लोकांना डावलून कॉंग्रेसला देत असलेल्या अतिमहत्वामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.
भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या अडेलतट्टू भूमिकेला कंटाळून अनेकांनी पक्षापासून दूर राहत शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षासाठी झटून सुद्धा आपली कामे होत नसल्याने कुणासाठी काम करायचे? हा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. पगारी, नाका कामगार असलेले आयटी सेल आणि रोजंदारीवर राबणारे कार्यकर्ते वगळता फारसे कुणी तिकडे फिरकत नाहीत. मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार गटाची प्रशांत ठाकूर यांना साथ मिळताना दिसत नाही. Panvel Latest News

कांतीलाल कडू यांनी आज शहरात धावती भेट दिली. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा बदल निश्‍चित असल्याचे अनेकांनी त्यांना ठासून सांगितले. त्यामुळे दोन्ही आजी, माजी आमदार आता ‘रिटायर्ड’ करायचेच असल्याचे मतदार सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0