Panvel News : अनधिकृत इमारतीवर सिडकोची कारवाई
•सिडको चे नैनाचे प्राधिकरण याची कारवाई, खाजगी विकासकांनी सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम
पनवेल :- कोळखे पेठ येथील सर्वे क्रमांक 123/14 भूखंडावर सिडकोच्या नैना प्राधिकरणाने कारवाई करत इमारत जमीन दस्त केले आहे. एका खाजगी विकासाकडे या भूखंडावर अनधिकृतपणे इमारत उभारली होते.नैना प्राधिकरणाच्या लक्षात आल्यावर प्राधिकरणाने सदर भूखंड खाली करण्याकरिता संबंधित विकासाला नोटीस बजावली होती. परंतु विकासाकडे त्या नोटीसला केराची टोपली दाखवली.
विकासाकरून पत्राला कोणतेही उत्तर न आल्याने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 च्या कलम अन्वये अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून ते बांधकाम करण्यापूर्वी जमीन ज्या स्थितीत होती त्या स्थितीत आणून ठेवावी, तसे न केल्यास सदर कायद्याच्या अन्वये सदर अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 च्या कल (6) (अ) खाली फौजदारी कोर्टात विकासका विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर कारवाई करत 24 जुलै रोजी चार मजल्याच्या इमारतीवर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.