ठाणे

Thane Water Cut : “ठाणेकरांना बुधवारी ‘ड्राय डे’ – 12 तास पाणी पुरवठा बंद”

Thane Water Supply Cut News : पावसाळ्यापूर्वीची देखभाल, नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणे :– पावसाळ्याच्या तोंडावर टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक देखभाल आणि उपकरणांची दुरुस्ती करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. या कामांमुळे 4 जून रोजी, बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांच्या कालावधीत शहरातील विविध भागांचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. Thane Water Supply Cut New

4 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान ठाण्याचे अनेक भाग ठरणार कोरडे

या बंदचा थेट फटका घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, गांधी नगर, सिध्देश्वर, समता नगर, सिध्दांचल, रुस्तमजी, जेल परिसर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळवा परिसरातील काही भागांना बसणार आहे. या काळात या भागांमध्ये एकही थेंब पाणी मिळणार नाही.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, अत्यावश्यक देखभालीनंतरही पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास 1-2 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्या दरम्यान कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, आणि गरज नसताना पाणी खर्च करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0