Panvel News : खंडणीखोर शादाब बेगवर ब्लॅकमेलिंगप्रकरणी गुन्हा

हुक्कापार्लरवाल्याकडून केली होती 50 हजारांची मागणी
पनवेल जितिन शेट्टी : ट्वीटर अर्थात एक्स या समाजमाध्यमाव्दारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दोन जणांवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खारघर येथील हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर कामे चालतात. ते सर्व आम्ही ट्वीट करु. ते काढायचे असेल तर पन्नास हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे म्हणत दोन जणांनी हुक्का पार्लरच्या मालकाला ब्लॅकमेल केले.
दमदाटी करत दहा हजार रुपये खंडणी घेतली म्हणून कळंबोली येथील २३ वर्षीय युवकाच्या फिर्यादीवरुन दोन जणांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला. शादाब बेग हा परिसरातील अनेकांना वृत्त प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा करत होता काही दिवसापासून त्याने एक टोळी निर्माण केली होती जी ट्विटरवर बातम्या टाकून खंडणी गोळा करण्याचे काम करत होती मात्र खारघर पोलिसांनी या टोळीचा मुखीया शादाब बेग याला बेड्या ठोकल्या असून पोलिसांनी अजूनही यांच्या ट्विटरटीमची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.