क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Panvel News : पनवेलमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! 3 लाख किमतीच्या गांजासह बिहारचा तरुण गजाआड

Panvel Police Latest Crime News : गाढी नदी परिसरात रचला सापळा; अमलीपदार्थमुक्त नवी मुंबईसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

पनवेल l नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तांच्या ‘अमलीपदार्थमुक्त’ मोहिमेला पनवेलमध्ये मोठे यश मिळाले आहे. पनवेल रेल्वे स्थानकाजवळील Panvel Railway Station मोराज सोसायटीच्या पाठीमागे, गाढी नदीच्या परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका 33 वर्षीय तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे पावणेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत साधारण ३ लाख रुपये इतकी आहे. Panvel Police Latest News

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक तरुण अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजाचा मोठा साठा आढळून आला.

आरोपीचे बिहार कनेक्शन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनुरागकुमार रामसोबीत यादव (वय 33) असे असून, तो बिहार राज्यातील बेगुसराई जिल्ह्यातील रहिवासी आहे. अनुरागकुमारने हा गांजा पनवेलमध्ये कोठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या तस्करीमागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिस आयुक्तांचा कडक इशारा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमलीपदार्थ तस्करांविरुद्ध कडक धोरण अवलंबले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही आणि यात पोलीस कर्मचारी सहभागी आढळल्यास थेट निलंबनाचे आदेश दिले आहेत. याच सर्तकतेमुळे पनवेल पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली. आरोपीवर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0