मुंबई

Mumbai Mosques : भोंगे गेले, अजान तशीच सुरू!

MumbI High Court On Mosques Sound : न्यायालयाच्या निर्देशांनंतर मशिदींचा डिजिटल पर्यायाकडे कल; ॲप आणि घरगुती स्पीकर्सचा वापर वाढला

मुंबई | ध्वनी प्रदूषणावर न्यायालयाने लावलेल्या बंधनांमुळे मुंबईतील मशिदींनी आता नव्या मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. अजान थांबवली नाही, पण भोंग्यांच्या जागी डिजिटल पर्याय निवडत अनेक मशिदींनी मोबाईल ॲप्स, घरगुती स्पीकर्स, आणि वायरलेस सिस्टिमचा वापर सुरू केला आहे. Mumbai Latest News

ध्वनी मर्यादा उल्लंघनावर कडक कारवाई करत मुंबईत आतापर्यंत 1608 लाऊडस्पिकर हटवण्यात आले असून, यामध्ये 1149 मशिदीवरील भोंगे होते, अशी माहिती सरकारने विधानमंडळात दिली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबई ‘लाऊडस्पीकर मुक्त’ झाल्याचा दावा केला होता.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील एका सोसायटीमध्ये घराघरात स्पीकर्स बसवून त्यांना मशिदीच्या मुख्य साउंड सिस्टिमशी जोडण्यात आलं आहे. यामुळे कोणत्याही सार्वजनिक लाऊडस्पिकरशिवाय घरातच अजान ऐकता येते.
या उपक्रमाचे नेतृत्व करणारे रहिवासी रझाक शेख म्हणतात, “भोंग्यांवर कारवाई होणार, हे लक्षात घेऊन आम्ही गेल्या वर्षीपासूनच साऊंड सिस्टिम बसवायला सुरुवात केली. आज तब्बल 50 घरांमध्ये अजान ऐकू येते.”

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथे विकसित करण्यात आलेल्या विशेष ॲपद्वारे अजान ऐकवण्याची संकल्पना सध्या मुंबईत जोर धरते आहे. महिम येथील जुमा मशीद, मदनपुरा येथील सुन्नी बडी मशीद यांच्यासह शहरातील 2 डझनहून अधिक मशिदींनी या ॲपचा वापर सुरू केला आहे. यामुळे अजान पूर्वीप्रमाणे वेळेवर पोहोचते, पण ध्वनी मर्यादेच्या चौकटीत.

लाऊडस्पिकर बंदीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असल्या, तरी काही मशिदी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एक नवा आदर्श निर्माण करत असल्याचं चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0