मुंबई

Panvel News : पोटे कुटुंबियांच्या एका युगाचा आज झाला अस्तस्व.कै.हरिभाऊ नारायण पोटे अनंतात विलीन

पनवेल : पनवेल शहरातील नामांकित असे पोटे मसालेचे संस्थापक स्व.कै.हरिभाऊ नारायण पोटे यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

पोटे कुटुंबीय हे पनवेलमधील अत्यंत जुने कुटुंबिय. एकूण हे 6 भाऊ होते. त्यापैकी 5 भावांचे यापूर्वीच निधन झाले असून आज त्या भावांपैकी लहान असलेल्या हरिभाऊ पोटे यांनी पनवेल शहरातील निरामय रुग्णालयात अखेरचा श्‍वास सोडल्याने खर्‍या अर्थाने पोटे कुटुंबिय एका दिलदार त्याचप्रमाणे व्यक्तशील तसेच दानशुर व्यक्तीला हरपला आहे. 75 वर्षे पूर्वी त्यांनी मिरची गल्ली येथून पोटे मसाले हा व्यवसाय सुरू केला व आजमितीस पोटे मसाले हा आता पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा असा मसाला आहे. कारण त्यांनी त्या काळी घेतलेली मेहनत महत्वाची आहे. व्यवसायाबरोबर व्यायामाची आवड असल्याने आज शेवटच्या क्षणी सुद्धा ते योगासने तसेच सायकलवरुन पनवेलभर फिरत असत. त्यामुळेच त्यांचे शरीर तंदुरुस्त होते. आ.प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या पतंग महोत्सवात सुद्धा ते हिरीहिरीने भाग घेत असत. त्यामुळे त्यांचे कौतुक सर्वजण करीत होते.

व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा तसेच गरजू व अडलेल्या नडलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव होता. तसेच वक्तशीरपणा हा त्यांच्या अंगात भिनलेला होता. आज त्यांची दोन्ही मुले विनायक व मिलींद हा व्यवसाय पुढे चालवित आहेत. तसेच इतर व्यवसायात सुद्धा त्यांचा हातभार आहे. स्व.कै.हरिभाऊ पोटे यांचे मोठे बंधू भालचंद्र नारायण पोटे हे सुद्धा पनवेल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून होवून गेले आहेत. आज त्यांच्या पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी येथील श्री स्मरण बंगला येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्ययात्रेला त्यांचे नातेवाईक, समाजबांधव तसेच मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0