Panvel News : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे – राष्ट्रीय अध्यक्ष :- गणेश कचकलवार
६ जानेवारी २०२५ पत्रकार दिनानिमित्त नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित
पनवेल जितिन शेट्टी : नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे ठरले असून राज्यभरातील सर्व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.अल्पवाधितच फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची बांधणी करून कमी वेळेत आपल्या कार्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य संघटनेला जुळविले व संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे.समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर हे ब्रिद वाक्य समोर ठेवून एक वर्षाआधी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली.
एवढ्या कमी वेळेत देशभरातील पत्रकारांना संघटनेशी जुळवून त्यांच्या अडिअडचणी व समस्या सोडवून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे काम युवा ग्रामीण संघ करत आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे.असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.