Panvel News : दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात मा. आमदार बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव
पनवेल जितिन शेट्टी : शेकाप चे माजी आमदार बाळाराम पाटील MLA Balaram Patil यांनी महविकास आघाडीच्या वतीने दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे . पनवेलच्या शेकाप कार्यालय बुधवारी २ ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांना या बाबतीत अवगत केले. Panvel Latest News
११८ पनवेल विधानसभा मतदार संघात ६ लाख ४२ हजार ५७ मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार मतदान करणार आहेत.यातील ८५ हजाराहून अधिक मते दुबार आणि बोगस असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. निवडणुक आयोगाकडे अद्यावत नोंदणी सॉफ्टवेअर असल्याने त्याचा वापर करून दुबार आणि बोगस नोंदणी विरोधात अभियान चालवण्यात यावे असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी याचिका मध्ये नमूद केले आहे. Panvel Latest News
तूर्तास १८८ मतदार संघात २५८५५ मतदारांची दुबार नोंदानिवशाली आहे. १५० एरोली मतदार संघात १६०९६ ,उरण मतदार संघात २७२७५, बेलापूर मतदार संघात १५३७६ , नावे पनवेल मतदार संघात अंतर्भूत झालेली .या व्यतिरिक्त ५८८ नावाचं कन्नड अथवा अन्य दक्षिण भारतीय भाषांच्यात पता नमूद आहे.तसेच संपूर्ण नाव नमूद नाहीं ही सर्व नावे मतदान यादीतून वगळण्यात यावी अशी मागणी आमदार बाळाराम पाटील यांनी याचिका क्रमांक WPST NO- २८०८०/२०२४ द्वारे केली आहे.
यावेळी उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील,पनवेल कृषी समितीचे अध्यक्ष नारायण घरत, पनवेल विधानसभा संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडु आणि नरेंद्र गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते. Panvel Latest News