Panvel News : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) रिक्षाचालकांवर कारवाई

पनवेल : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) Panvel RTO एसटी स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली रिक्षा Rickshaw Driver चालकांवर कारवाईची मोहीम सुरू आहे, यावेळी अनेक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. पनवेल आरटीओ मार्फत रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. बहुतांशी रिक्षाचालक विना लायसन्स, विना वर्दी व कागदपत्रे नसताना प्रवासी वाहतूक करतात. Panvel RTO News
त्यामुळे त्यांच्यावर आरटीओने कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. पनवेल बसस्थानक परिसरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली आरटीओने रिक्षाचालकांवर कारवाईला सुरुवात केली. यावेळी आरटीओचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका होऊन देखील अद्याप रिक्षा मीटरप्रमाणे चालत नाहीत. तरी अश्या रिक्षांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येते आहे . Panvel RTO News
Web Title : Panvel News : Action taken against rickshaw pullers by Regional Transport Department (RTO).