Panvel Murder News : पनवेल शिरढोण, येथील महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमच्या शेजारी अज्ञात मृतदेह,खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा
Panvel Police Solved Murder Mystery In 12 Hours : गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई ; शिरढोण, पनवेल सापडलेल्या मृतदेहाचा 12 तासात केला उलगडा
पनवेल :- शिरढोण ,मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या महेंद्र ट्रॅक्टर शोरूम च्या शेजारी हायवेवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. “Mystery in Panvel: Dead Body Found in Mahindra Tractor Showroom” गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी अवघ्या बारा तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला जेरबंद केले आहे. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. Panvel Police Latest News
“Murder in Panvel: Police Detain Suspect in 12-Hour Body Discovery Case”
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 ऑगस्टच्या सकाळच्या दरम्यान महेंद्र ट्रॅक्टर शोरूम च्या मुंबई गोवा महामार्गाच्या लगत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना सांगितले होते. तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. “Panvel Police Uncover Strange Connection in Tractor Showroom Death Mystery” पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे यांचे एक पथक घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि आरोपीचे आर्थिक व्यवहार याकरिता चार पथके तयार करण्यात आली होती. Panvel Police Latest News
“Trending News Alert: Police Arrest Suspect in Connection with Mysterious Death at Mahindra Tractor Showroom”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी मयत व्यक्ति काम करत असलेल्या ठिकाणाची कामगाराकडे तपासणी केली असता मयत आणि आरोपी यांचे आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्याचा तांत्रिक तपास ,तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती काम करणारा इतर व्यक्ती अमितकुमार रामआश्रय राय (20 वर्ष,रा.शिरढोण, पनवेल मुळ, रा. औरंगाबाद बिहार) याच्यासोबत आर्थिक व्यवहार झाले होते.या संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता अमितकुमार यांने मयत व्यक्ती यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून जीवे ठार मारल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील चौकशी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली जात आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली असून खुनाचा उलगडा केला आहे. Panvel Police Latest News
पोलीस पथक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष 2, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, प्रताप देसाई, मानसिंग पाटील, गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेल तसेच मध्यवर्ती कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, महेश जाधव, सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक, संजय रेडड़ी, राहुल भदाणे व गुन्हे शाखा कक्ष 2 चे पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. Panvel Police Latest News