Panvel Murder News : राहत्या घरामध्ये आईसह मुलाचा मृतदेह सापडल्याने कामोठ्यात खळबळ

पनवेल : पनवेल तालुक्यातील कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये आज वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. Panvel Latest Crime News
कामोठे वसाहतीमधील रूम नंबर 104, ड्रीम हौसिंग सोसायटी, सरोवर हॉटेलच्या बाजूला, सेक्टर 6 ए, कामोठे येथील एका बंद रुममध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या संदर्भात आज दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल येथे तसे फायर ब्रिगेड येथे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार कामोठे पोलिसांचे पथक Kamothe Police Station व फायर ब्रिगेड सदर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये गॅस सदृश्य वास येत असल्याचे प्राथमिक दिसून आले व त्या रुमध्ये राहणार्या गीता भूषण जग्गी, वय 70 वर्षे व तिचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी, वय 45 वर्ष हे मृत अवस्थेत मिळून आले आहेत. याबाबत कामोठे पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेवून एमजीएम कामोठे येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्याचप्रमाणे घटनास्थळाची फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास कामोठे पोलीस करत आहेत.