•उसने दिलेले 49 हजार रुपये परत न मिळाल्याने केला खून; महिला तपास पथकाच्या कौशल्याला सहाय्यक आयुक्तांनी दिले श्रेय
पनवेल :- कुंडेवहाळ गावात 55 वर्षीय संगिता नामदेव म्हात्रे यांचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या तपासात पनवेल शहर पोलिसांच्या महिला तपास पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या परिश्रमामुळे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा प्रेरणादायी संदेश मिळाला असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले.
25 ऑक्टोबर रोजी सकाळी कुंडेवहाळ येथील घर क्रमांक 471 मध्ये संगिता म्हात्रे यांचा मृतदेह गळा आवळलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी धाव घेतलेल्या पनवेल शहर पोलिसांना तपासात महिलेचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी संगिता यांचा मुलगा सनी म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसल्याने सुरुवातीला हा तपास अधिक आव्हानात्मक बनला होता.
मात्र, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे, सारिका झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे आणि पोलीस शिपाई विशाल दुधे यांच्या पथकाने परिसरातील 30 पेक्षा अधिक नागरिकांची कसून चौकशी केली. या मेहनतीमुळे पथकाला आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, संगीता यांच्या घरापासून काही अंतरावर राहणारा संशयित आरोपी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय 23) याने मृत महिलेला चाळीस हजार रुपये उसने दिले होते. वारंवार पैसे परत मागूनही रक्कम परत न मिळाल्याने संतापून आरोपीने संगीता यांचा गळा आवळून त्यांचा खून केला होता.
महिला पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया स्वबळावर यशस्वीपणे पूर्ण केली. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय ऐनपुरे आणि उपायुक्त प्रशांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पनवेल पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि महिला सबलीकरणाचा हा एक उत्तम नमुना असल्याचे गौरवोद्गार सहाय्यक आयुक्तांनी काढले.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…