Panvel Municipal Corporation : टपाल नाका येथे महापालिकेच्यावतीने मोठी अतिक्रमण कारवाई

पनवेल : टपाल नाका येथे रस्ता रूंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे Panvel Municipal Corporation यांच्या निर्देशानूसार ,अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके व प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 जानेवारी रोजी सहा गाळ्यांवरती निष्कांसन कारवाई करण्यात आली. तसेच टपाल नाक्यावरील 80-90 वर्षे जुनी धोकादायक , एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर,सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, तसेच प्रभाग अधिक्षक सदाशिव कवठे, प्रभारी अधिक्षक रोशन माळी, प्रभारी अधिक्षक अरविंद पाटील, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.तसेच पनवेल शहर वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतुक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने याठिकाणी रस्ता रूंदीकरण करणे महत्वाचे होते. या कामात अडथळा येणाऱ्या सहा गोळयांवर आज पालिकेच्यावतीने जेसीबीच्या साहाय्याने मोठी निष्कांसन कारवाई करण्यात आली. तसेच येथील 80-90 वर्षे जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.